मुंबईतील सुप्रसिद्ध रेस्टॉरंट Britannia & Co चे मालक Boman Kohinoor यांचे निधन
Boman Kohinoor (Photo Credits: YouTube)

मुंबईतील सुप्रसिद्ध असे इराणी रेस्टॉरंट Britannia & Co चे मालक Boman Kohinoor यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 97 वर्षांचे होते. आज (बुधवार, 25 सप्टेंबर 2019) दुपारी 4.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते प्रकृतीअस्वास्थ्याच्या कारणास्तव मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

बोमन कोहिनूर यांच्यावर प्रसिद्ध अशा ब्रिटानिया अॅण्ड को रेस्टॉरंटची जबाबदारी अत्यंत तरुण वयात आली. साधारण 1923 मध्ये बोमन कोहिनूर यांचे वडील रशीद कोहिनूर यांनी Britannia & Co या रेस्टॉटची स्थापना केली. रशीद कोहिनूर हे एक झोरोएस्टेरियन प्रवासी होते.  मात्र, पुढे बोमन कोहिनूर हे केवळ 20 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडीलांनी या रेस्टॉरंटची जबाबदारी कोहिनूर यांच्यावर सोपवली. WWII च्या काळात पारसी आणि इराणी भोजनालयांना मुंबईत मोठी मागणी असे. ही मागणी ओळखूनच Britannia & Co हे रेस्टॉरंट जन्माला आले. पुढे या रेस्टॉरंट पर्यंटक आणि मुंबईतील उच्चभ्रू वर्गात चांगलेच लोकप्रिय ठरले.

बोमन केहिनूर हे एक मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असत. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या लोकांशी गप्पा मारणे हे बोमन कोहिनूर यांचा आवडता छंद असे. बोमन कोहिनूर यांच्यासोबत गप्पा मारणे ही ग्राहकांसाठी एक आनंदाची पर्वणी असे. बोलताना ते ग्राहकांना अनेकदा जुने फोटो दाखवायचे. तसेच, ग्राहकांना काय हवं नको हे पाहण्यासाठी ते वेटर्सवर फारसे अवलंबून असत नाही. तर, कोहिनूर हे स्वत:च ग्राहकांना काय हवे नको ते पाहात असत. (हेही वाचा, ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, किरण नगरकर यांचे निधन)

Britannia & Co हे रेस्टॉरंट केवळ भोजन, नाश्ता आदी कारणांसाठीच नव्हे तर, तोथाल आदरातिथ्य हिसूधा या रेस्टॉरंटची प्रमुख ओळख होती. तीन वर्षांपूर्वी जेव्हा प्रिन्स विल्यम आणि डचेस ऑफ कँम्ब्रीज कैथरीन मिडलटन मुंबई येथे आले तेव्हा त्यांनीही Britannia & Co चे मालक बोमन कोहिनूर यांची आवर्जून भेट घेतली होती. त्यावेळी #WillKatMeetMe हा हॅशटॅग प्रचंड चर्चेत आला होता.