'अंडरग्राउंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली वा कोलकात्याला जावं लागेल', देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारावर टिकास्त्र
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

विरोधकांचे सरकारवर टिका करणे हे राजकारणासाठी काही नवी गोष्ट नाही. त्यात उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकारवर देखील अनेक मुद्द्यांना घेऊन विरोधकांचे टिका करण्याचे काम सुरुच असते. त्यातच आता मेट्रोचा मुद्दा घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टिका केली आहे. “पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावं लागेल” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने आरे येथे कारशेडसाठी जागा निश्चित केली होती. मात्र, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेडची ही जागा रद्द करुन इतरत्र हालवण्याचे प्रयत्न झाले. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वर्षभराचा लेखाजोगा या पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणात ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.हेदेखील वाचा- Maharashtra-Karnataka Tussle: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना अजित पवार यांचे सडेतोड उत्तर- 'मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार'

यावेळी त्यांनी एक प्रसंग सांगितला. "मी नुकतचं दिल्लीहून एअरपोर्टला जाण्यासाठी मेट्रोमध्ये बसलो तेव्हा मला एक तास लागला. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की, कुलाब्यावरुन मुंबई विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला 2021 मध्ये केवळ 25 मिनिटं लागतील. आता 2021 साल आलं. 80% काम झालं होतं. मग माझ्या लक्षात आलं की पुढील दोन तीन वर्षे काम होऊ शकत नाही. कारण जर मुंबई विमानतळावर कुलाब्यातून किंवा मुंबईतील कुठल्याही भागातून लोकल किंवा मेट्रो-3 मधून जायचं असेल तर आरेमध्येच कारशेड करावं लागेल. पण काही लोकांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला त्यामुळे पुढील चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो-3 मध्ये बसता येणार नाही. मुंबईकरांना मेट्रो-3 किंवा अंडरग्राउंड मेट्रोचे जर फोटो काढायचे असतील तर दिल्ली किंवा कोलकात्यालाच जाऊन फोटो काढावे लागतील आपल्याला मुंबईत तशी संधी मिळेल असं आम्हाला वाटत नाही.'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाचं मोठा पक्ष ठरला हे जनतेनं दाखवून दिलं. त्यामुळे यापुढेही आपल्याला मोठं काम करावं लागेल" असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे जेवढा वेळ विरोधी पक्षात राहू सत्तेचा विचार डोक्यात आणायचा नाही असा सल्ला देखील आपल्या कार्यकर्त्यांना दिला.