Mumbai: सायबर फसवणूकीला बळी पडलेल्या महिलेने गमावले चक्क 98 हजार रुपये
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Mumbai: मुंबईत एका महिलेला टॅक्सीची सुविधा देणाऱ्या अॅपचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून 98 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सदर 40 वर्षीय महिलेने आरे कॉलनीतील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून याचा आता अधिक तपास केला जात आहे.(Dombivli: डोंबिवलीत ताडी प्यायल्याने दोघांचा मृत्यू, दुकान मालकावर गुन्हा दाखल)

महिला ही ठाणे पश्चिम येथे राहते. तिने पोलिसांना असे सांगितले की, ती तिच्या मुलाला गेल्या महिन्यात फिल्म सिटी येथे एका ऑडिशनसाठी घेऊन जात होती. त्यावेळी तिने ऑटोरिक्षाचे बुकिंग एका अॅपचा वापर केला. तिला ऑटोरिक्षा देण्याऐवजी तिच्यासाठी कंपनीने टॅक्सी पाठवली. त्यांना उशिर होत असल्याने ते अखेर कॅबमध्ये बसले. त्या दोघांचे बिल 1380 रुपये झाल्याने तिने ते अॅपच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न केला. परंतु काही समस्या उद्भवल्याने तिला ते भाडे भरता आले नाही.

महिलेने इंटरनेटवर संबंधित कॅबच्या कंपनीचा क्रमांक शोधून काढला आणि त्यावर तिने फोन केला. अजाणपणे ती एका सायबर फसवणूकीला बळी पडत असल्याचे तिला कळलेच नाही. अॅपच्या माध्यमातून तिच्या मोबाईचा एक्सेस सायबर फसवणूकदाराला मिळाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.(Mumbai Cyber Crime: लष्करी रुग्णालयातील अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाला फसवणूक, खात्यातून 1.2 लाख घेतले काढून)

जेव्हा महिलेने पैसे देण्यासाठी ई-वॉलेटमध्ये डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरले तेव्हा फसवणूकदाराला तिचे सर्व डिटेल्स मिळाले. त्याचवेळी त्याने तिच्या खात्याातून चक्क 98 हजार रुपयांनी रोकड चोरली. पैसे काढण्यासाठी काही ट्रांजेक्शन झाल्याने त्याचे मेसेज महिलेला येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी तिची फसवणूक झाल्याची तिला कळले. तेव्हा तिने तातडीने तिचे नेटबँकिंग खाते बंद करत पोलिसात धाव घेतली.