Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

ढगाळ आकाश आणि मध्यम पावसासह तापमान किमान 26 अंश सेल्सिअस ते कमाल 32 अंश सेल्सिअस राहील.

Image Credit: Pixabay

Mumbai Weather Prediction,July3: भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ आकाश आणि मध्यम पावसासह तापमान किमान 26 अंश सेल्सिअस ते कमाल 32 अंश सेल्सिअस राहील.मुंबईत पुढील दोन तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील. मात्र 6 जून पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वेळी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने लावलेला. पण जुलै महिना चालू झाला अद्याप पावसाचा जोर वाडल्याचे दिसून येत नाही,पण 6 जुलै नंतर पावसाचा जोर वडण्याचा अंदाज आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ५ जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान खात्याने मुंबई कहा उद्याचा हवामान अंदाज लावला आहे  वाचा: Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज असं राहील वातावरण, वाचा हवामान अंदाज

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

पालघर,रायगड व रत्नागिरी येते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. व घाट ही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे