Mumbai Water Cut: मुंबईत येत्या 13 जुलै रोजी पाणी कपात, पहा कोणत्या भागात परिणाम होणार
Tap Water. Representational Image. (Photo Credits: File Image)

Mumbai Water Cut:  मुंबई मध्ये महापालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याने नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या 13 जुलै रोजी पाणी पुरवठा बंद राहणार असून याचा काही विभागांना फटका बसणार आहे. त्यानुसार पश्चिम उपनगर येथील एच पश्चिम, के पूर्व आणि के पश्चिम भागाता पाणी पुरवठ्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याच कारणामुळे या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.(Gokul Milk Price Hike: गोकूळ दुधाच्या खरेदी-विक्रीच्या किंमतीत वाढ, येत्या 11 जुलै पासून नवे दर लागू होणार)

पाणी पुरवण्या संदर्भातील बटरफ्लाय व्हॉल्व बदलण्यात येणार आहे. त्यामुळे जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज, खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व) या परिसरात येत्या 13 जुलै रोजी पाणी येणार नाही किंवा कमी दाबाने सोडले जाईल असे सांगण्यात आले आहे. हे काम 13 जुलै रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पाडले जाणार आहे. यामुळे नागरिकांनी आधीच पुरेसे पाणी भरुन ठेवावे असे महापालिकेने म्हटले आहे.(Mumbai Local Update: कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासात सवलत? BMC ने दिले 'हे' उत्तर)

तर गिलबर्ट हिल, चार बंगला आणि मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग येथील परिसरात कमी दाबाने पाणी सोडले जाणार आहे. तर जुहू-कोळीवाडा येथे सकाळी 8-9.15 वाजताच्या दरम्यान नागरिकांना पाणी पुरवठा केला जाईल. मात्र विलेपार्ले पश्चिम, जे. व्ही. पी. डी नेहरु नगर येथे पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्याचसोबत खोतवाडी, गझरबंध, एस. व्ही मार्ग (खार), लिकिंग रोड, सांताक्रुज (पश्चिम), खार (पश्चिम) येथे दैनंदिन वेळे ऐवजी पाणी सकाळी 6.30 ते 9 दरम्यान सोडले जाणार आहे.