अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला फर्लो रजा मंजूर, प्रदीर्घ काळानंतर मुंबईत परतणार

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) उर्फ 'डॅडी' याला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर झाली आहे.

अरुण गवळी (फोटो सौजन्य-फेसबुक)

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) उर्फ 'डॅडी' याला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर झाली आहे. तर अरुण गवळी मुंबईत दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईमधील निवडणूक झाल्यानंतर अरुण गवळी याला तुरुंगातून काही दिवसांसाठी सुट्टी देण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले होते. तर अरुण गवळी यांना जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करत आहे. मात्र कारागृहात दाखल झाल्यानंतर घरातील विविध कार्यक्रमांसाठी फर्लो रजा गवळी याला देण्यात आली होती.(ठाणे: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत अग्निशमन सुरक्षेचे नियम न पाळणा-या 15 रुग्णालयांना पालिकेने ठोकले टाळे)

फेब्रुवारी महिन्यात गवळी याने रजा मिळण्यासाठी उपमहानिरिक्षकांकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर उच्च न्यायालयात याबद्दल सुनावणी करण्यात आली. मात्र मुंबईत निवडणूकीच्या काळात तुरुंगातून सोडले असता अनुचित घडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता मुंबईतील निवडणूका संपल्यावर गवळी याला फर्लो रजा मान्य करण्यात आली आहे.