Mumbai Records Worst Air: मुंबईत लॉकडाऊन नंतर शुक्रवारी सर्वाधिक दुषित हवेची नोंद
(Representational Image/ Photo Credits: PTI)

Mumbai Records Worst Air: साउथ वेस्ट मान्सून परतला असून आणि  कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेले नियम सुद्धा हळूहळू उठवले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी मुंबईत सर्वाधिक दुषित हवेची नोंद करण्यात आली आहे. तर AQI या वेळी 118 वर पोहचल्याचे सांगण्यात आले असून मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर ही अत्यंत वाईट हवेची नोंद केल्याचे सांगण्यात आले आहे.(Maharashtra Weather Forecast: 10 ऑक्टोबर पासून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता)

एकूणच AQI हा 118 आला असून जवळजवळ 9 ठिकाणचे परिक्षण SAFAR यांच्याकडून केले जाते. तर 101-200 ही मध्यम दुषित हवेची नोंद मानली जाते. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले होते. मात्र शुक्रवारी सर्वाधिक AQI 100 वर पोहचल्याची नोंद केली गेली आहे. साउथ वेस्ट मान्सून परतल्याने वेगाने वारे वाहत नाही आहेत. पण प्रदुषण होण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे सफरचे प्रोजेक्ट डिरेक्टर गुफरान बेग यांनी म्हटले आहे.(Maharashtra Monsoon Update: मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता- IMD)

रविवार पासून हवेच्या गुणवतेत्त सुधार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण नॉर्थ अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा 9 ऑक्टोंबरला निर्माण झाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाने हजेरी लावल्याचे ही दिसून आले. IMD यांच्याकडून ठाणे आणि रायगड येथे मंगळवार पर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करत यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. त्याचसोबत पालघरसाठी सोमवारी आणि मंगळवारी यल्लो अलर्ट आयएमडीकडून जाहीर केला आहे. शुक्रवारी सर्व भागात यल्लो अलर्ट जाहीर केला होता पण संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पावसाने दडी मारल्याचे दिसले.