Mumbai Rains: मुंबईत जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती
Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत काही ठिकाणी मागीत सहा तासात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुबई आणि परिसरात जोरदार पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे. दक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे आल्हाददायक गारवा मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या महिन्यातील अपेक्षित पाऊस पडला आहे. यात पहिल्या 6 दिवसात 60% पाऊस झाला आहे. रविवारी मुंबईत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड ब्रेकिंग पावसाची नोंद झाली होती. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पासून मागेल काही दिवस कायम आहे. 506.4mm इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हे देखील वाचा-Mumbai Rains Today: मुंबई व लगतच्या भागात आज अधून मधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार

ट्वीट-

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमध्ये गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असून तलावातील पाणीसाठय़ात सुमारे 51 हजार 685 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. पावसाने दडी मारल्याने जूनमध्ये खालावलेली जलपातळी वाढू लागली आहे.