Beggar Free Mumbai: भिकारीमुक्त मुंबई लवकरच, Mumbai Police राबवत आहेत मोहिम
Beggar Free Mumbai | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्राची राजधानी आणि आंतरराष्ट्रीय शहर असलेली मुंबई (Mumbai ) आता भिकारी मुक्त (Beggar-Free Mumbai) होणार आहे. भिकारीमुक्त मुंबई (Beggar-Free Mumbai) निर्माण करण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) कार्यरत झाले आहेत. त्यांनी एक मोहिमच (Mumbai Police's Special Campaign For Beggar-Free Mumbai) सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबई शहरातील भिकाऱ्यांना पकडून ताब्यात घेण्यात येईल. या भिकाऱ्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी केंद्रात दाखल केले जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरात भिक मागणाऱ्या भिकाऱ्यांसाठी मुंबईतील चेंबुर परिसरात भिक्षेकरी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये या भिकाऱ्यांची सोय केली जाणार आहे. पकडलेल्या सर्व भिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतरच त्यांना या केंद्रात स्थान दिले जाईल. ही मोहीम पुढच्या काही महिन्यात अधिक व्यापक करण्यात येईल. त्याची सुरुवात मात्र मुंबई पोलिसांनी याच महिन्यापासून केली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील काही भिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

मुंबई शहरात महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. त्यातील अनेक लोक रोजीरोटी आणि पर्यटन तसेच इतर कारणांमुळे येत असतात. यात काही भिकाऱ्यांचाही समावेश आहे. शहरातील रस्ते, नाके आणि सिग्नलवर आशाळभूत चेहऱ्याने भिकारी उभे असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. भिक मागणाऱ्यांपैकी अनेक लोक धडधाकट असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. काही लोक अपंग असतात तर काही निराधार. भिक मागणाऱ्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी एक माहिम हाती घेतली आहे.