Fact Check: मुंबई पोलिसांनी दहशतवादी समजून कलाकार पकडल्याची बातमी पूर्णतः खोटी; ट्विट करत दिली माहिती
मुंबई पोलिसांचे ट्विट (संग्रहित-संपादित प्रतिमा)

महाराष्ट्राच्या पालघर (Palghar) जिल्ह्यात, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दहशतवादी समजून चित्रपटातील कलाकार पकडले असल्याची बातमी आज सकाळी अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. मात्र यामध्ये तथ्य नसून, मुंबई पोलिसांनी अशा कोणत्याही दोन व्यक्तींना पकडले नसल्याची माहिती मिळत आहे, स्वतः मुंबई पोलिसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे या माध्यमांना अशा खोट्या बातम्या नक्की कुठून मिळतात आणि त्यातील सत्यता पडताळून न घेता त्या ते कशा काय प्रसिद्ध करू शकतात असे प्रश्न निर्माण होत आहेत.

देण्यात आलेले वृत्त असे होती की, 'महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात अतिरेकी असल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. सर्च ऑपरेशन सुरु करून, सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या काही तासांमध्ये अशा दोन लोकांना पकडण्यात आले. मात्र त्यानंतर ते दोन लोक चित्रपटातील कलाकार असल्याचे आढळून आले. यशराजसाठी ते काम करत होते.' (हेही वाचा: मुंबई पोलिसांनी दहशतवादी म्हणून केली अटक; मात्र ते होते हृतिक रोशन याच्या सिनेमातील कलाकार!)

अरबाज खान आणि बलराम गिनवाल अह्सी अशी या दोघांची नावे सांगण्यात आली होती.

मात्र आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणावरील पडदा दूर केला आहे. tv9 गुजराती या वृत्तसंस्थेला टॅग करत बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तपासणी करावी असे म्हणत ट्विट करण्यात आले आहे.