Gold-Plated Teeth | (Photo Credit - Twitter/ANI)

सोन्याचा दात (Gold Plated Teeth) लावून फिरणाऱ्या आणि पाठिमागील 15 वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. प्रविण आशुभ (Pravin Ashubha) असे या आरोपीचे नाव असून, तो 38 वर्षांचा आहे. तो समाजामध्ये एलआयसी एजंट (LIC Agent) म्हणून वावरत होता. सन 2007 मध्ये तो एका कपड्याच्या दुकानात कामाला होता. तेथे त्याने 40,000 रुपयांचा अपहार आणि फसवणूक करुन पलायन केले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल होता. मात्र, तो फरार होता.

मुंबई पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी आरोपीने ओळख बदलून गुजरातमधील कच्छ येथे स्थलांतर केले . प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीण सिंग उर्फ प्रदीप सिंग आशुभा जडेजा असे त्याचे नाव आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीवर फसवणूक आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप होता. अटक केल्यानंतर काही दिवसांनी आरोपीला कोर्टातून जामीन मिळाला. नंतर, सुनावणीनंतर आरोपी मुंबईतून फरार झाला आणि पुन्हा कोर्टात हजर झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले, ”पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Guhagar Love Story: प्रियकराचा श्रृंगार उघडा पडला, बुरख्यातली बाई बाप्या निघाला; गुहागरच्या शृंगारतळी बाजारात भलताच प्रकार घडला)

प्रवीण 2007 मध्ये एका कापडाच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याच्या मालकाने एकदा त्याला दुसऱ्या व्यापाऱ्याकडून 40,000 रुपये घेण्यास सांगितले. त्याने पैशांची बॅग घेतली आणि त्याच्या मालकाला देण्याऐवजी स्वत:च त्यावर डल्ला मारुन पोबारा केला. त्याने पोलिस आणि मालकाची दिशाभूल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रविण यास अटक केली. कोर्टाने त्याला जामीन दिला. पण नंतर तो फरार झाला.

ट्विट

मुंबई पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी, पोलिसांनी पुन्हा शोध तपास सुरू केला होता ज्यात त्यांनी आरोपीच्या माजी साथीदारांची चौकशी केली. पोलिसांना समजले की प्रवीण मांडवीच्या साभ्राई गावात लपला आहे. जे गाव गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील एका तालु्क्यात येते. पोलिसांनी एलआयसी एजंट म्हणून काम केले आणि प्रवीणला मुंबईला बोलावले. आपल्याला हवाअसलेला आरोपी तोच आहे याची खात्री झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.