Coronavirus: खासगी वाहनांच्या आतमध्ये मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही, महापालिकेचा निर्णय
Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असल्यास प्राथमिक स्वरुपात मास्क घालणे बंधनकारक असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच काही जणांकडून मास्क न घातले जात असल्याच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. याच दरम्यान आता खासगी वाहनांच्या आतमध्ये मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही असे मुंबई महापालिकेने (BMC) स्पष्ट केले आहे. परंतु सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून प्रवास करताना मास्क घालणे अनिवार्य असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(CM Uddhav Thackeray Launches COVID-19 Vaccination Drive in Mumbai: मुंबईत कोविड-19 लसीकरणाला प्रारंभ; नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन)

शहरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता 8 एप्रिल पासूनच महापालिकेने नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तर दंड स्विकारण्याव्यतिरिक्त नियम मोडणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी कामे करण्यासह सांगितले गेले. जसे झाडू काढणे. परंतु तरीही त्यांनी नियमाचे उल्लंघन केले तर दंड नक्कीच स्विकारला जात आहे.(Coronavirus: राज्यातील सर्वसामान्यांना कोरोनाची लस मोफत देण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी)

Tweet:

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत महापालिकेने 1 हजार ते 200 रुपयांपर्यंत दंड वसूली केली आहे. या कामासाठी महापालिकेचे दरदिवसाला 42 लोक काम करत असून त्यांनी 10 हजार रुपये प्रति दिवस दंड वसूल केला आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर पर्यंत महापालिकेने 4.86 लाख लोकांच्या विरोधात मास्क न घातल्याने कारवाई केली आहे. यामधून महापालिकेने 10.7 लाख कोटींची दंडाची रक्कम वसूल केली आहे.