मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस तीन दिवस रद्द; 'या' कारणासाठी ठेवण्यात आली ही रेल्वे सेवा बंद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई-नागपूर रेल्वे मार्गाला जोडणारी नंदीग्राम एक्सप्रेस (Nandigram Express) 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. नांदेड विभागात दुसऱ्या मार्गाचे काम सुरू असल्याने नागपूर- मुंबई- नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस काही तारखांना रद्द करण्यात आली आहे. रेल्वेच्या नांदेड विभागातील मुदखेड- परभणी दरम्यान दुसऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे नंदीग्राम रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे 11402 नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान बंद राहील. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यात 11401 मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे 19302 यशवंतपूर-डॉ. आंबेडकर ही `12 फेब्रुवारी रोजी यशवंतपूरवरुन सुटणारी गाडी पूर्णा-मुदखेड-निजामाबाद-काचीगुडा या नियोजित मार्गाने न जाता पूर्णा-परभणी-निजामाबाद-विकाराबाद मार्गे आंबेडकरनगर येथे जाईल.

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार

नंदीग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई ते नागपूरदरम्यान रोज धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस औरंगाबाद व नांदेड मार्गे धावते.

त्यामुळे या मार्गांना जोडणारी महत्त्वाची सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. नंदीग्राम एक्सप्रेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांच्या होणा-या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांनी यादरम्यान रेल्वेला सहकार्य करावे अशी विनंती ही करण्यात आली आहे.

नव्या नियमानुसार प्रवाशाजवळ तत्काळमध्ये काढलेली तिकिट कन्फर्म असून रेल्वे उशिराने आली किंवा तुम्हाला त्यावेळी प्रवास करणे रद्द करायचा झाल्यास तुम्ही टीडीआर फाइल करु शकता. मात्र टीडीआर फाइल न केला नाही तर कोणतेही पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. तसेच जर तुमच्याकडे ई-तिकिट आणि तुम्ही वेटिंगवर असल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. कारण या तिकिटाने प्रवास केल्यास तुमच्याकडे अवैध तिकिट असल्याचे मानले जाणार आहे.