Iqbal Singh Chahal: मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची केंद्रीय सचिवपदी बढती

मोदी सरकारने इक्बाल सिंह चहल यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. हा टप्पा आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा विशेष उल्लेख करायला हवा, ज्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.

Iqbal Singh Chahal: मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची केंद्रीय सचिवपदी बढती
Iqbal Singh Chahal (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना केंद्र सरकारने (Central Govt) सचिवपदी बढती दिली आहे. “आयएएस अधिकारी म्हणून माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे,” असे इक्बाल सिंह चहल म्हणाले. विशेषत: इक्बाल सिंह चहल हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात. मोदी सरकारने इक्बाल सिंह चहल यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. हा टप्पा आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा विशेष उल्लेख करायला हवा, ज्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. चहल यांनी पोलीस आणि शासनाच्या इतर विभागांच्या 800 हून अधिक इनोव्हा वाहनांचे तात्पुरत्या रुग्णवाहिकेत रूपांतर करून हजारो लोकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्याचा अनोखा पुढाकार घेतला होता. तसेच कोरोना संकटात गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबईत ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही.

1989 च्या बॅचचे अधिकारी आहे इक्बाल चहल

इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. चहल हे यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. तसेच  जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. चहल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही त्यांनी काम केले असून, औरंगाबाद आणि ठाण्याचे जिल्हाधिकारीही होते. (हे देखील वाचा: आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आले आहेत 'हे' 4 आरोप; वाचा सविस्तर)

जलसंपदा खात्यामध्ये मोठी कामगिरी

केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च 2013 ते मार्च 2016 या कालावधीमध्ये सोपवली होती. गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्ये भरीव योगदान दिलेल्या चहल यांनी जलसंपदा खात्यामध्ये केलेल्या कामगिरी आधारे जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट जलसिंचन व्यवस्थापनाचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 10:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).