Free Mobile Phone Library: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटामुळे देशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल तसेच इंटरनेट सुविधांमुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडथळा येत होता. मात्र, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि खाजगी उर्दू शिक्षक संघाने (Pvt Urdu Teachers Union) इमामवाडा परिसरातील (Imamwada Area) इयत्ता 1 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'विनामूल्य मोबाइल फोन लायब्ररी' (Free Mobile Phone Library) सुरू केली आहे. या सुविधेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच ज्यांना मोबाईल फोन घेणं परवडत नाही, असे विद्यार्थी या ऑनलाइन वर्गात शिकत आहेत. आतापर्यंत 22 विद्यार्थी या वर्गात सहभागी झाले आहेत.
केंद्र प्रभारी शाहीना सय्यद यांनी सांगितलं की, 'काही विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोन नव्हते किंवा त्यांच्या कुटुंबात एकच मोबाइल फोन होता. म्हणून आम्ही विनामूल्य मोबाइल फोन लायब्ररी सुरू केली. सध्या त्यांना ऑनलाईन शिकवले जाते असून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत या विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले जातात. या दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेतली जाते, असंही शाहीना सय्यद यांनी सांगितलं. (हेही वाचा - Maharashtra’s Recovery Rate: महाराष्ट्रासाठी शुभसंकेत! राज्यातील रिकव्हरी रेट आता 85.65 टक्क्यांवर)
Some students either didn't have mobile phones or there was only one mobile phone in their family. So we did this. They're taught online & their syllabus is being completed. Classes are held from 8 am to 3 pm. All COVID-19 SOPs are being followed: Shahina Sayed, Centre Incharge https://t.co/wL6mIkxBB5 pic.twitter.com/lKimIL2Biy
— ANI (@ANI) October 18, 2020
अपुऱ्या सोयी-सुविधेमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं अशक्य होतं आहे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना आता विनामूल्य मोबाइल फोन लायब्ररीमुळे दिलासा मिळाला आहे. उर्दू शिक्षक संघ 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन मोबाइल फोन लायब्ररीची स्थापना करीत आहे. या लायब्ररीमध्ये 10 स्मार्टफोन, वायफाय कनेक्टिव्हिटी, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालयांची सुविधा असणार आहे. या मोफत सुविधेचे उद्घाटन दक्षिण मुंबईतील इमामवाडा येथे 14 ऑक्टोबर रोजी झाले आहे. सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत त्यांचे स्लॉट बुक करावे लागतील. अशी आणखी दोन ग्रंथालये लवकरच वांद्रे पूर्वेतील बेहराम बाग आणि साकीनाका येथील मोहिली गावात सुरू करण्यात येणार आहेत.