मुंबई: Metro 3 च्या सिद्धिविनायक ते दादर स्थानकाच्या भुयारीकरणाचा 35 वा टप्पा पूर्ण
Metro 3 Phase 35 (Photo Credits-Twitter)

मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) मधील सिद्धिविनायक (Siddhivinayak) ते दादर (Dadar) या दरम्यानचा असलेला 1.12 किमीच्या 35 व्या भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यासह पॅकेज 4 चे एकूण 10.96 किलोमीटर लांबीच्या भुयारीकरणाचे काम ही बुधवारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या कामासाठी 3 टीबीएम मशीनचा वापर केला गेला आहे. मेट्रो 3 मध्ये 7 पैकी 4 पॅकेजेसमध्ये भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. परंतु पॅकेज 4 मध्ये भुयारीकरणाचे काम करणे म्हणजे मोठे आव्हान होते.(Mumbai AC Local: मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण एसी लोकल सेवा आजपासून सुरु, प्रवाशांनी केले स्वागत)

पॅकजेमधील सर्व कामे ही मंदिरे, रस्ते वाहतूक किंवा धार्मिक स्थळांच्या येथे केली जात आहेत. हेरेन्कटकेट कंपनीच्या माध्यमातून तयार केलेले आणि आर्थ प्रेशर बॅलेन्स तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या टीबीएम कृष्णा 1 च्या माध्यमातून भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याचे काम जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच याचे काम करण्यास घेण्यात आले होते.(Mumbai Local: शालेय शिक्षक व शाळांमधील इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी; Railways ने मान्य केली सरकारची मागणी )

Tweet:

दरम्यान, दादर मेट्रो स्थानकाचे काम 42 टक्के पूर्ण झाल्याची माहिती प्रकल्पाचे संचालक एस. के. गुप्ता यांनी दिली आहे. तर पॅकेज 4 मध्ये दादर, सिद्धिविनायक, शीतलादेवी या स्थानकांचा समावेश आहे. या ठिकाणी 8 भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण करण्यात आल्याचे ही सांगण्यात आले आहे.