Mega Block: आज हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai MegaBlock: दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मुंबईच्या तिन्हीही लोकल रेल्वे मार्गांवर (Mumbai Railway) मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. या रविवारी (24/2/2019) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. मेगा ब्लॉकचा त्रास टाळण्यासाठी या विशिष्ट वेळा लक्षात घेऊनच बाहेर पडा. तर पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आज काहीसा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर आज सकाळी 11:20 ते सायंकाळी 3:50 पर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल. त्यामुळे विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद लोकल सेवा सुरु असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणाऱ्या सर्व लोकल 10 मिनिटे उशिराने धावतील. तर कर्जत-खोपोली दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत पॉवर ब्लॉक असेल.

हार्बर रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावर सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:10 दरम्यान मेगाब्लॉक असेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावरील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे/ गोरेगावला जाणाऱ्या गाड्या वेळापत्रकानुसार धावणार नाहीत.