उद्या बदलापूर- कर्जत दरम्यानचा मेगा ब्लॉक रद्द
Local Train | Representational Image | (Photo Credits: File Photo)

मध्य रेल्वेने रविवारी (14 एप्रिल) रोजी घेण्यात येणारा बदलापूर-कर्जत दरम्यान मेगाब्लॉक रद्द केला आहे. तर भादेवी स्थानकावर पूलाकरीता गर्डर उभारणीसाठी पश्चिम रेल्वेकडून प्रभादेवी ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच वेळापत्रकाप्रमाणे इतर स्थानकांदरम्यानचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुलासंबंधीच्या कामासाठी बदलापूर-कर्जत दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेणार येणार होता. काही कारणामुळे हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. परंतु प्रभादेवी ते चर्चगेट येथे मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानचा ब्लॉक पूर्वी जाहीर केलेल्या वेळेप्रमाणे पार पडणार आहे. ब्लॉकमुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर ब्लॉककाळात डाऊन धीमी लोकल थांबणार नाहीत. अप जलद मार्गावरील लोकल सुमारे १५ मिनिटे आणि डाऊन जलद लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.