Mumbai Mayor Threatens Call Accused Arrested: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, 10 जानेवारी पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

Mumbai Mayor Threatens Call Accused Arrested: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकावल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामुळे या प्रकरणी अधिक तपास केला असता एका 20 वर्षीय आरोपीला गुजरात मधील जामनगर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच तरुणाने किशोरी पेडणेकर यांना फोन करत धमकावल्याचे म्हटले आहे. आरोपीचे नाव मनोज डोडिया असे आहे. गुरुवारी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी मनोज याला कोर्टात हजर केले. यावर आता निर्णय देत त्याला येत्या 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनोज याला बुधवारीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण आरोपीने किशोरी पेडणेकर यांना कोणत्या कारणावरुन धमकावले हे कळू शकलेले नाही. या आरोपीने किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांना आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.(Kishori Pednekar: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जीवे मारण्याची धमकी; आजाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)

Tweet:

आरोपीने किशोरी पेडणेकर यांना फोन करत हिंदीत बोलणे केले होते. तसेच अपशब्द सुद्धा त्यांना वापरले. तर पोलिसांकडे फक्त मोबाईल क्रमांक होता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस आरोपी मनोज याच्या पर्यंत पोहचू शकले. दरम्यान, महापालिकेच्या निवडणूका पुढील वर्षात पार पडणार आहेत. पेडणेकर या 2019 मध्ये मुंबई महापालिकेच्या महापौर झाल्या होत्या. तसेच त्या शिवसेनेच्या नगरसेवक ही आहेत.