ट्रान्सहार्बर मार्गावरील कोपरखैराणे येथे ट्रेनचा पॅन्टोग्राफ तुटल्याने ठाणे-पनवेल दिशेने जाणारी वाहतुक ठप्प
Cable break at Koparkhairane station (Photo Credits: Twitter)

कोपरखैराणे येथे ट्रेनचा पॅन्टोग्राफ तुटल्याने पनवेल-ठाणे वाहतुक ठप्प झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना ठप्प झालेल्या वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच अप आणि डाऊन मार्गाने ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रवाशांना हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकावर सुचना देण्यात येत आहे.बुधवारी मुंबईत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे आणि वाशी सेंट्रल आणि हार्बर लाइन्स वर पावसाचे पाणी साचल्याने लोकल बंद करण्यात आल्या होत्या.