रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मध्यरात्री मेगाब्लॉक, काही लोकल्स रद्द
मुंबई लोकल ( प्रातिनिधिक चित्र ) photo credits: PTI

रेल्वे प्रशासनाकडून डागडुजीचं काम करण्यासाठी दर आठवड्याला रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. मात्र यंदा शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रविवारी नेहमीच्या वेळात असलेला मेगा ब्लॉकचा त्रास या आठवड्यात होणार नाही. आज शनिवार - रविवार दम्यान तिन्ही मार्गावर मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

तिन्ही मार्गावर मध्य रात्री मेगा ब्लॉक

६ ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी मध्यरात्री माटुंगा- मुलुंड डाऊन जलद मार्गावर ०१.०० वाजल्यापासून सकाळी ०६.०० वाजेपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला /माहीम अप व डाऊन हार्बर मार्गावर ०१.२० वा. पासून सकाळी ६.२० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ या स्थानक दरम्यान रात्री १२. ३० ते पहाटे ४. ३० पर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे.

कोणत्या लोकल रद्द ?

रेल्वेच्या या विशेष मेगा ब्लॉकमुळे विद्या विहारहून सुटणारी ५. ३९ ची कुर्ला - कल्याण, दादर हुन सुटणारी ६.४८ ची कल्याण लोकल रद्द करण्यात आली आहे. तर दादर हून सुटणारी ८.७ ची कल्याण लोकल विद्या विहार हुन ८. २१ ला सुटेल. तसेच मध्य रेल्वे वर रविवारी सकाळी धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून चालण्यात येतील .