Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) कोविड-19 (Covid-19) च्या आरटी-पीसीआर चाचणीच्या (RT-PCR Test) किंमतीत घट करण्यात आली आहे. चाचण्यांच्या किंमतीत 30 टक्कांनी घट करण्यात आली असून आता चाचणीसाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.

मुंबई विमातळावरील आरटी-पीसीआर टेस्टची किंमत पूर्वी 850 रुपये इतकी होती. परंतु, सरकारने दिलेल्या आदेशानुसार, 1 एप्रिलपासून या टेस्टसाठी प्रवाशांना 600 रुपये आकारण्यात येतील. (राज्यात कोविड चाचण्यांच्या दरांमध्ये पुन्हा कपात; जाणून घ्या रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज, RT PCR Test चे नवे दर)

कोविड-19 आरटी-पीसीआर टेस्ट, रॅपिड अँटीजन टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्टच्या किंमतीमध्ये घट करण्यात यावी, अशी घोषणा राज्य सरकारने बुधवारी केली. त्यानुसार लॅब किंवा हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर टेस्टसाठी 850 ऐवजी 600 रुपये आकारण्यात येतील. तर रॅपिड अँटीजन टेस्टसाठी केवळ 150 रुपये आकारण्यात येतील.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर टेस्ट करणारे काऊंटर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आले. या काऊंटर आतापर्यंत 3 लाखांहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार, युनिक मॉलिक्युलर टेस्टिंग करणारे हे देशातील पहिले विमानतळ आहे. चाचण्यांच्या अहवालाची वाट  बघणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विमातळावर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

टर्मिनल 2 वर सध्या 3 वेगवेगळ्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 30 हून अधिक आरटी-पीसीआर टेस्ट करणारे काऊंटर्स सुरु करण्यात आले आहेत.