घाटकोपर येथे मोबाईल दुकानाला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे कार्य सुरु
Ghatkopar Fire (Photo Credits-Twitter)

मुंबईतील (Mumbai) घाटकोपर (Ghatkopar) येथे पूर्वेला गेस्टहाऊस जवळ असलेल्या एका मोबाईलच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी (29 मार्च) घडली आहे. या मध्ये कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे कार्य शर्थीने सुरु आहेत. तसेच परिसरात वर्दळ असल्याने प्रथम गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच घाटकोपर परिसरातील स्थानिकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगण्यात येत आहे.