मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 8 रुग्ण आढळल्याने आकडा 2597 वर पोहचला, BMC ची माहिती
Coronavirus (Photo Credits: PTI)

मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 8 रुग्ण आढळल्याने आकडा 2579 वर पोहचला आहे. याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. धारावीत कोरोनाचे सध्या 82 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले असून 2257 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. धारावीत कोरोनाची हळूहळू परिस्थिती सुधारली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. या ठिकाणी दाटीवाटीने लोकवस्ती असली तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून सर्वोतोपरी खबरदारी महापालिकेकडून घेण्यात येत आहे.

धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण 1 एप्रिल या दिवशी आढळून आला होता.त्यानंतर मे महिन्याच्या अखेर पर्यंत 946 रुग्णांसह आकडा 1830 वर पोहचला होता. मुंबईतील धारावीत कोरोनाचे गेल्या महिन्यात 500 रुग्णांची नोंद झाली होती. तिच आकडेवारी आता दोन डिजिटवर आल्याचे दिसून आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच 100 पेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर जुलै 1 या दिवशी धारावीत कोरोनाचे 535 रुग्णांची नोंद झाली होती ती एकूण 2282 रुग्णांच्या 23 टक्के होती.(महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 137 जणांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू)

दरम्यान, राज्यात कालच्या दिवसभरात 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,68,265 ऐवढी झाली आहे. तर राज्यात नवीन 6,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,05,521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,45,961 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 16,476 वर पोहोचला असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली आहे.