मुंबई: धारावीत आज कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी 8 जणांची भर पडल्याने आकडा 2309 वर पोहचला-BMC
Coronavirus (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात आले आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचे आज नव्याने 8 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावी मधील कोरोनाबाधितांचा आकडा 2309 वर पोहचला असून आतापर्यंत 84 जणांचा बळी गेल्याची  माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

धारावीत कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे. तसेच धारावीत गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनामुळे नव्याने एका सुद्धा व्यक्तीचा बळी गेला नाही आहे. परंतु तरीही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. धारावीत नागरिक दाटीवाटीने राहत असल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य आहे. मात्र धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.(महाराष्ट्र: COVID19 च्या पार्श्वभुमीवर वसई- विरार येथे दुकांनाच्या वेळांवर निर्बंध)

दरम्यान, मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास आकडा 80699 वर पोहचला असून 4689 जणांचा बळी गेला आहे. तसेच 50691 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचसोबत कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहेत.  परंतु आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून नियमात शिथिलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच मुंबईतील नागरिकांना घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाण्यासाठी