मुंबईतील धारावीत कोरोनाच्या आणखी 36 रुग्णांची नोंद झाल्याने आकडा 2480 वर पोहचला, महापालिकेची माहिती
Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आकडा दिवसागणिक वाढत चालला असून तो आता 3 लाखांच्या पार गेल्याची आकडेवारी शनिवारी समोर आली आहे. त्यामुळे अधिकच चिंता व्यक्त केली जात असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, पालघर आणि पुणे हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरत आहेत. याच दरम्यान दाटीवाटीने लोकवस्ती असलेल्या मुंबईतील धारावीने मात्र या कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे दिसून आले आहे. तर कोरोनाच्या आणखी 36 रुग्णांची नोंद धारावीत झाली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3480 वर पोहचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.(ठाणे येथे एका दिवसात 12 हजार COVID19 च्या रुग्णांची प्रकृती सुधारली, हॉटस्पॉट वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊन उठवला)

धारावी पॅटर्सनचे मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. येथील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे ही दिसून येत आहे. तर सध्या धारावीत फक्त 143 अॅक्टिव्ह रुग्ण असून 2088 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे ही महापालिकेने म्हटले आहे. धारावीत कोरोनाच्या रुग्णांचा वाढीव रेट ही कमी झाला आहे. तरीही महापालिकेकडून सातत्याने धारावीत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणासह योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना सुद्धा स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.(मुंबईतील महापालिकेच्या 9 रुग्णालयांचे Non-COVID सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात येणार)

दरम्यान, कालच्या दिवसभरात राज्यात 8 हजार 348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार, आतापर्यंत राज्यात एकूण 3,00,937 कोरोनारुग्ण आढळले आहेत. यापैकी 11 हजार 596 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये दिलासादायक बाब अशी की, काल राज्यातील 5 हजार 307 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.