मुंबई: दादर येथे एकाच दिवसात COVID19 चे आढळले सर्वाधिक रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 1734 वर पोहचल्याची BMC ची माहिती
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

मुंबईतील दादर (Dadar) येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर गेल्या 24 तासात दादर येथे कोरोनाचे जवळजवळ 45 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1734 वर पोहचला आहे. तर गुरुवार पर्यंतच्या दादर मधील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास येथे 458 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1203 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, जी नॉर्थ वॉर्ड मध्ये आज 66 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.(महाराष्ट्र: लातुर येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरवर चाकूहल्ला)

 जी नॉर्थ वॉर्ड मधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5957 वर पोहचला आहे. त्याचसोबत 4818 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावी, माहिम आणि दादर असा परिसर मिळून जी नॉर्थ येथे 744 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर  धारावीत आणखी 6 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2551 वर पोहचला आहे.(मुंबईतून तब्बल 21.39 लाखांचे बनावट N95 मास्क जप्त, एकाला अटक)

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आतापर्यंत 80 अॅक्टिव्ह रुग्ण असून 2220 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. दरम्यान, माहिम येथील 15 आणखी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1672 वर पोहचला आहे. तेथे 206 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1395 जणांना डिस्चार्ज दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. परंतु कंन्टेंटमेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी गोष्टी अनलॉकिंगनुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईत सध्या 1,11,991 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुगण आढळून आले आहेत. त्यापैकी 85,327 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 20,123 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 72 दिवस झाला आहे. मुंबई महापालिकेकडून गुरुवार पर्यंत 11,643 कोरोना व्हायरस संदर्भातील चाचण्या पार पडल्या आहेत. तसेच आतापर्यंत पाच लाखांहून अधिक चाचण्या गेल्या काही दिवसात पार पडल्याची माहिती देण्यात आली होती.