मुंबई: दादर पोलिस स्टेशन कॉलनी मध्ये सिलेंडरचा स्फोट;  आगीत होरपळून 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू  (Watch Video)
Dadar Blast (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या दादर पोलिस स्टेशन कॉलनीमध्ये (Dadar Police Station Colony) आज (12 मे) सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 3 घरांचे नुकसान झाले असून अग्निशामक दलाच्या 4 गाड्या रवाना झाल्या आहे. ही आग दुपारी 1.40 वाजण्याच्या सुमारास लागली आहे. स्फोटाच्या आगीमध्ये 15 वर्षांची मुलगी गंभीर जखमी  झाली आहे.  होती. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मृत मुलीचं नाव श्रावणी चव्हाण आहे.

 दुर्घटनेचा व्हिडिओ

ANI Tweet

शिवाजी पार्क पोलिस स्टेशन जवळच ही कॉलनी आहे. मदतीसाठी अग्निशामन दल आणि अ‍ॅम्ब्युलंस दाखल झाली असून मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.