Coronavirus in Mumbai: मुंबईत मागील 24 तासांत आढळले 1217 नवे कोविड-19 चे रुग्ण; शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,42,099 वर
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून , आज ( 28 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 1217 नवे रुग्ण आढळले असून 30 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची (COVID-19 Positive) एकूण संख्या 1,42,099 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 7562 वर पोहोचला आहे. मुंबईत सद्य घडीला 19,401 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मागील 24 तासांत मुंबईत 1241 नवे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,14,818 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या पाहता रिकव्हरी रेट 0.81% इतका झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81% इतका झाला आहे. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत 7,43,885 कोविड चाचण्या झाल्या असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. COVID-19 Update in Dharavi: धारावीत आज दिवसभरात आढळले 5 नवे कोरोनाचे रुग्ण- BMC

तर महाराष्ट्र राज्यात 14,361 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7 लाख 47 हजार 995 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 80,718 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 5 लाख 43 हजार 170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

भारतात दिवसागणित कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील 24 तासांत 77,266 नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 33,87,501 वर पोहचला आहे. तर एकूण 61,529 मृतांची नोंद झाली आहे.