मुंबई: मध्य रेल्वेच्या 'ऑपरेशन धनुष' च्या माध्यमातून तिकिट दलालांकडून 9 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सणासुदीच्या काळात रेल्वेच्या तिकिटात काळाबाजार करणाऱ्या काही दलालांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेने ऑरपेशन धनुष च्या माध्यमातून तिकिट विक्रीबबात होणाऱ्या काळाबाजाराचा पर्दाफाश केला आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्काकडून असे सांगण्यात आले आहे की, 287 तिकिटांसह 23 दलालांना अटक केली आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या तिकिटांपैकी 1008 अशी तिकिटे आहेत ज्याचा वापरुन नागरिकांनी प्रवास केला आहे.

पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी दलालांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अनुसार आरपीएच्या सल्ल्यानंतर सर्व तिकिटे आयआरसीटीद्वारे रद्द करण्यात येणार आहेत. ऑपरेशन धनुषचे मुख्य उद्देश हे दीवाळी दरम्यान नागरिकांची रेल्वेसाठी होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला.तसेच ई-तिकिटांच्या माध्यमातून होणाऱ्या काळाबाजारावर पण चाप बसवण्यात आला आहे.(मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अपघात: महामार्गावरील चुकीच्या पार्किंगमुळे 2 वर्षांत 106 जणांचा मृत्यू)

तिकिटांच्याबाबत होणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी नागरिकांना अधिकृत रेल्वे तिकिट दलालांकडूनच ती खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत खोट्या तिकिटांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्याचा वापर करुन नगरिक प्रवास करु शकत नाही याची सुद्धा सुचना दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून अशा प्रकारावर आळा बसण्यासाठी छापेमारी करण्यात येईल असे ही सांगण्यात आले आहे.