मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

केंद्र सरकारने बुधवारी 20 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. केंद्राचे हे पॅकेज निराशाजन असल्याची नाराजी व्यक्त करत हाती काहीही लागणार नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये श्रमिक आणि रोजगारासाठोी काहीही नसल्याचे ही विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्र मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हिच ती वेळ असल्याचे ही आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, भारताच्या जडणघडणीत मुंबई शहराचा फार मोठा वाटा आहे. देशात कररुपाने सर्वाधिक पैसा हा मुंबईतूनच जमा होत होता. परंतु आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात 5 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त)

केंद्र सरकार देशातील नागरिकांची दिशाभूल करण्यात असल्याचे विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये असंघटित, सार्वजनिक आणि रोजगार क्षेत्रासाठी कोणतीही तरतूद करण्यात आल्याचे दिसुन येत नसल्याचे ही विरोधाकांकडून टीका करण्यात आली आहे. परंतु भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे समर्थन केले आहे. या पॅकेजमुळे लघु, मध्यम उद्योग, बांधकाम उद्योग,सह अन्य कामांसाठी सवलती जाहीर झाल्याने रोजगारास चालना मिळेल असे नड्डा यांनी म्हटले आहे.