Child Trafficking: मुंबईच्या वांद्रे परिसरात 10 महिन्यांच्या बाळाची 3.5 लाखांत तस्करी, पोलिसांनी तेलंगणामधून सोडवलं 24 तासांत; 4 जण अटकेत
तेलंगणाच्या धर्मराव याने तो आणि त्याची पत्नी निपुत्रिक असल्याने हा बाळ मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचं कबुल केले यामध्ये त्याने मुलाला घेण्यासाठी 1.5 लाख शेखला तर 1.7 लाख अन्य दोघांना दिल्याचं सांगितलं.
मुंबई मध्ये वांद्रे (Bandra) येथील एस वी रोड परिसरातील बॅन्ड्रा पोलिस चौकीजवळून एका 10 महिन्याच्या बालकाची तस्करी झाली. हे बाळ साडेतीन लाखांत तेलंगणामधील (Telangana) एका सरकारी कर्मचार्याला विकलं होतं पण मुंबई पोलिसांनी 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत बाळाची सुटका केली आहे. यामध्ये मुंबईत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर 2 जण तेलंगणाचे अटकेत आहेत.
31 ऑगस्टला बाळाची तस्करी झाली नंतर पोलिसांनी कारवाई करत तेलंगणामधून बाळ परत आणत त्याला आईपाशी सुपूर्त केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, आईला 1 सप्टेंबरच्या दुपारी 2 च्या सुमारास आपलं बाळ जवळ नसल्याचं समजलं. तिने तातडीने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना माहिती देताना तिने मागील काही दिवस 13 वर्षीय मुलासोबत एक महिला तिला भेटत असल्याचं सांगितलं. त्यावरून स्केच बनवण्यात आलं आणि ते सक्युलेट करण्यात आलं. यावरून काहींनी तिची ओळख पटवून तिला सकाळी एका लहान मुलासोबत पाहिल्याचं सांगितलं.
ANI Tweet
पोलिसांनी 33 वर्षीय फरहान शेखला पकडल्यानंतर तिने तिच्या साथीदारांची नावं सांगितली. त्यांच्याकडून धर्मराव याला बाळ 3.2 लाखांना विकल्याचं सांगत तो गाडीने तेलंगणाला रवाना झाल्याचेही सांगितलं. पोलिसांनी त्याला तेलंगणाला पोहचताच बेड्या ठोकल्या आणि बाळ ताब्यात घेतलं. (नक्की वाचा: महाराष्ट्रात बिहार येथून अल्पवयीन मुलांची तस्करी, RPF च्या कारवाईमुळे खुलासा.
धर्मराव याने तो आणि त्याची पत्नी निपुत्रिक असल्याने हा बाळ मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचं कबुल केले यामध्ये त्याने मुलाला घेण्यासाठी 1.5 लाख शेखला तर 1.7 लाख अन्य दोघांना दिल्याचं सांगितलं. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.