मुंबई: कोरोनाबाधित रुग्णाला 200 किमी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेकडून स्विकारले जातात तब्बल 8 हजार रुपये
Coronavirus(Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकार क्वारंटाइन सेंटर आणि कोविडचे सेंटर उभारत आहेत. याच दरम्यान आता एक नवा प्रकार समोर आला असून कोरोनाबाधित रुग्णाकडून तब्बल 8 हजार रुपये खासगी रुग्णवाहिकेच्या मालकाकडून उकळले जात आहेत. ते सुद्धा कोरोनाबाधित रुग्णाला फक्त 200 किमी घेऊन जाण्यासाठी ऐवढे हजार रुपये घेतले जात आहेत. हा प्रकार एका कोविड रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णवाहिकेच्या चालकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा व्हिडिओ शूट केल्यानंतर समोर आला आहे.

कोरोनाची लक्षण दिसून येत असल्याने 1 जून रोजी कुर्ला येथील रहिवासी हबीब रुग्णालयात दाखल झाला. तर हबीब रुग्णालयात कोरोनासंबंधित काही सुविधा उपलब्ध नसल्याने आणि कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. त्यामुळे नातेवाईकाने सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जस्ट डायल वरुन एका खासगी रुग्णवाहिकेला फोन लावला. त्यानंतर जरीमरी स्थित असलेल्या एक मोबाईल रुग्णवाहिका रुग्णासाठी आली. परंतु रुग्णाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी 10 हजार रुपये मोजावे लागतील असे स्पष्ट केले.(Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत आज COVID19 चे आणखी 10 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1899 वर पोहचला, मुंबई महापालिकेची माहिती) 

कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजनची गरज असून त्याला साध्या वाहनामधून घेऊन जाणे धोक्याचे होते. त्यामुळे शेवटी रुग्णवाहिकेतून नेण्याचे ठरवले असता 8 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले. रुग्णाला हबीब रुग्णालय ते फौजीया हॉस्पिटल असा 200 किमीचा अंतर कापले. रुग्णावाहिकेतून रुग्णाला फौजीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचे पैसे देण्यासाठी नातेवाईक खाली आला. त्यावेळी त्याने चालकाला थोडे कमी पैसे घ्या अशी विनंती करत त्याने घातलेल्या पीपीई किट्सचे सुद्धा पैसे देण्यास तयार असल्याचे म्हटले. मात्र शेख या व्यक्तीने 8 हजार रुपयांच्या खाली मालक एक ही पैसा घेत नसल्याचे म्हटले. नातेवाईकाने रुग्णवाहिकेच्या चालकाला पैसे देण्यासोबत त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट केला.