वातानुकूलित रेल्वे तिकिटांचे दर 31 मे पर्यंत वाढवणार नाही, रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
येत्या 31 मे पर्यंत वातानुकूलित रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ होणार नसल्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
येत्या 31 मे पर्यंत वातानुकूलित रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ होणार नसल्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना वातानुकूलित रेल्वे तिकिटांच्या आगोदरच्या दरानेच प्रवास करता येणार आहे.
पश्चिम मार्गावरील पहिली वातानुकूलिन लोकल डिसेंबर 2017 मध्ये सुरु झाली. त्यावेळी तिकिटांचे दर कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 205 रुपये ठेवण्यात आले होते. त्यानंतर जून 2018 मध्ये भाडेवाढ करण्यात येणार होती. परंतु त्यानंतर सहा महिन्यांसाठी तिकिटांच्या दरात भाडेवाढ केली नाही. तर आता 24 मे पासून वातानुकूलिन लोकलसेवेच्या तिकिटात भाववाढ करण्यात येणार होती. परंतु पुन्हा भाडेवाढीला स्थगिती देण्यात आलेली आहे.(आज रात्री हार्बर मार्गावर मेगाब्लॉक)
तर पश्चिम रेल्वेला आतापर्यंत 1 कोटी 84 लाख रुपयांचा महसूल वातानुकूलित लोकलमुळे मिळाला आहे. तसेच नोव्हेंबर 2018 पासून लागू केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार वातानुकूलित लोकसाठी थांब्यांची संख्या वाढवली गेली आहे.