मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, ओला-उबर संप; वीकेंड साजरा करणाऱ्या मुंबईकरांची कोंडी
मुंबई लोकल Photo Credit : PTI

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली-कल्याणदरम्यानच्या मार्गावर येत असलेला पत्री पूल (हाजी मलंग ब्रिज) पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या काळासाठी जम्बो मेगॉब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, डोंबिवली ते कल्याण धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्याही सकाळी 9.15 ते दुपारी 3.45 या काळासाठी बंद असणार आहेत. त्यामुळे आठवड्याची सुट्टी साजरी करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडत असाल तर,तसे व्यवस्थापण करा.

दरम्यान, मेगाब्लॉक सोबतच मुंबईतील ओला, उबर टॅक्सी चालकांनीही संपाचे हत्या उपसले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकाच्या वाहतुक कोंडीत अधिकच भर पडणार आहे. दिलासादायक असे की, ब्लॉकदरम्यान, कल्याण आणि कर्जत/कसारा दरम्यानच्या रेल्वेसेवा सुरु असतील. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि डोंबिवली/ठाणेदरम्यानही रेल्वेसेवा सुरु असणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

रविवारी मुंबईत पोहोचणाऱ्या काही लांब पल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रक आणि मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईला पोहोचणाऱ्या गाड्या ब्लॉक काळात कर्जत-पनवे-दिवा अशा चालतील आमि दिवा जंक्शन स्टेशनवर थांबतील. तसेच, मुंबईवरुन सुटणाऱ्या काही गाडयाही दिवा-पनवेल-कर्जत अशा चालतील आणि दिवा जंक्शनवर थांबतील. (हेही वाचा, ओला, उबर टॅक्सी चालक पुन्हा संपावर; मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रवाशांची वीकेडंला अडचण)

सेवा रद्द झालेल्या मेल, एक्स्प्रेस

मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस , मुंबई-भुसावळ पॅसेंजर ,मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस ,पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रे, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ,जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस

दिवा स्थानकात थांबा एसलेल्या गाड्या

काकीनाडा पोर्ट-एलटीटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे मार्गक्रमण करतील. एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस, मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे चालवल्या जाणार आहेत. हावडा-मुंबई मेल व्हाया चौकी, राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस या गाड्या दिवा-वसई-जळगाव मार्गे चालवल्या जातील. त्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

वेळेत बदल करण्या आलेल्या एक्सप्रेस

सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी कामयानी एक्स्प्रेस, एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष गाडी, सीएसएमटी-हावडा मेल व्हाया चौकी, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. तर, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच चालवली जाईल. परतीच्या मार्गावर ही गाडी पुण्यातूनच कोल्हापूरसाठी रवाना होईल. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच चालेल. तिथूनच परतीच्या मार्गावर ती नागपूरसाठी रवाना होईल.