मुंबई: भारतीय नौदलातील सेवानिवृत्त 98 वर्षाच्या Sepoy यांचा कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा
कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातल्याने प्रशासनाकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच देशातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. त्याचसोबत पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा नागरिकांना कोरोनाच्या परिस्थितीत घरीच थांबवण्याचे आवाहन करत आहेत. अद्याप कोरोनाच्या विरोधातील ठोस लस उपलब्ध झाली नसून जगभरातील संशोधन त्यासंदर्भात अभ्यास करत आहेत. तर कौतुकाची बाब म्हणजे आतापर्यंत चिमुकल्या मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान आता भारतीय नौदलातील सेवानिवृत्त झालेल्या 98 वर्षीय सीपॉय (Sepoy) यांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिल्याची माहिती नौदलातून देण्यात आली आहे.

रामू लक्ष्णम सकपाळ असे त्यांचे नाव असून ते नेरुळ येथील रहिवाशी आहेत. रामू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नवल हॉस्पिटल शिप अस्विनीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. यांची प्रकृती ही गंभीर होती. रामू यांना कोरोनासह न्यूमोनियासुद्धा झाल्याने त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र आता रामू यांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.(महाराष्ट्रात पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 33 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू)

सकपाळ यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना INHS अस्विनीवर त्यांचे कौतुक करुन निरोप देण्यात आला. दरम्यान, भारतात कोरोनाचे आणखी 63,489 रुग्ण आढळून आले असून 944 जणांना बळी गेल्या 24 तासात गेला आहे. तर 944 बळी गेल्यानंतर देशातील एकूण कोरोनामुळे मृतांचा आकडा 50 हजारांवर पोहचण्याची शक्यता आहे. देशातील कोरोनाची रविवार पर्यंतची आकडेवारी पाहिली असता रुग्णांचा आकडा 25,89,682 वर पोहचला असून त्यापैकी 6,77,444 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच 18,62,258 जणांना डिस्चार्ज दिला आणि 49,980 जणांना मृत्यू झाला आहे.