Mumbai: बोरिवली येथे 11 वर्षीय मुलीचा इमारतीच्या 10व्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Death (Photo Credits-Facebook)

Mumbai: मुंबईतील बोरिवली येथे राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीचा इमारतीच्या 10व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हेतवी मेहता असे मुलीचे नाव असून तिच्या क्राफ्ट अॅक्टिव्हिटी करताना तिने नकळतपणे बालकनीची जाळी कापली असे पोलिसांनी सांगितले. मात्र हेतवी ही कशी खाली पडली याबद्दल काहीच कळले नाही. त्याचसोबत बालकनीत कॅमेरा सुद्धा नव्हता. या व्यतिरिक्त बालकनीला ग्रिल सुद्धा लावण्यात आली नव्हती.

हेतवी ही आपल्या आजी-आजोबा आणि आईसोबत राहते. इमारतीच्या जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने जोरात ओरडण्याचा आवाज ऐकला. परंतु ढगांमुळे नेमके काय झाले हे कळले नाही. त्यानंतर एका मुलीचा मृतदेह खाली पडल्याचे पाहिले असता तातडीने इमारतीच्या मॅनेजमेंटला याबद्दल सांगण्यात आले. इमारतीतून खाली पडण्यापूर्वी ती एका साइन बोर्डाला आपटली होती असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने म्हटले.(Pune: पुण्यामध्ये मैदानावर झालेल्या भांडणाबद्दल विचारणा केल्यावर दोन अल्पवयीन मुलांचा 40 वर्षीय व्यक्तीवर हल्ला, दोघांना अटक)

त्यावेळी एका व्यक्तीने पोलिसांना या घटनेबद्दल सांगितले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला सार्वजनिक रुग्णालयात नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.अन्य एक टीम ही तिच्याबद्दल अधिक शोध घेत होती.

रस्त्यावर ती पडल्याने तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी दारोदारी जाऊन लोकांना विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर हेतवी हिच्या घरी सनराईजच्या 10व्या मजल्याव गेले. तेव्हा तिच्या आजी-आजोबांना या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हते. तिच्या आजीने म्हटले की, हेतवी बाहेर खेळत आहे. परंतु ज्यावेळी तिच्या आजीला मृत मुलीचा फोटो दाखवला असता तिला तेव्हा धक्का बसला. यामुळे हेतवी हिच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणी जबाब सुद्धा नोंदवला जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बोरिवली पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस एस केळकर यांनी म्हटले की, या घटनेत कोणतेही चुकीचे कृत्य झाले नाही. पण हा एक अपघाती मृत्यू अल्याचे केळकर यांनी म्हटले. हेतवी 6 वी इयत्तेत शिकत असून ती एकुलती एक मुलगी होती. पोलिसांकडून इमारतीसह ऑफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जाणार आहेत.