भाऊबीजेला मुंबईकरांनी फस्त केले तब्बल 90 हजार किलो श्रीखंड
त्यामुळे मुंबईमध्ये भाऊबीजेला तब्बल 90 किलोहून अधिक श्रीखंडाची विक्री झाली आहे. तसेच दिवाळीत देण्याघेण्यासाठी गोड मिठाई म्हणून काजू कतलीची मुंबईमध्ये 50 हजार किलोची विक्री झाली आहे.
यंदा बहिणींनी भाऊबीजेसाठी (Bhaubij 2019) आलेल्या भाऊरायांसाठी कोंबडी-वड्याची मेजवानी न करता श्रीखंडपुरीला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाऊबीजेला तब्बल 90 किलोहून अधिक श्रीखंडाची विक्री झाली आहे. तसेच दिवाळीत देण्याघेण्यासाठी गोड मिठाई म्हणून काजू कतलीची मुंबईमध्ये 50 हजार किलोची विक्री झाली आहे. श्रीखंड (Shrikhand)विक्रीमध्ये मुंबईकरांनी केशर ड्रायफ्रूट, आम्रखंड, अंजीर, आदी फ्लेवरला पसंती दिली आहे. (हेही वाचा -Gudi Padwa 2019: गुढीपाडव्यासाठी खास घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसे बनवाल? जाणून घ्या रेसिपी)
मंगळवारी भाऊबीजेनिमित्त सर्व भाऊ आपल्या बहिणींच्या घरी पोहचले. कोकणामध्ये भाऊबीजेसाठी भाऊ घरी आल्यानंतर कोंबडी-वड्याचा बेत आखला जातो. परंतु, मासांहाराचा बेत फसल्याने बहिणींनी आपल्या भाऊरायासाठी श्रीखंडपुरीचा बेत आखला. त्यामुळे मुंबईमध्ये श्रीखंडाच्या विक्रीत वाढ झाली. मुंबईतील नामांकित मिठाईच्या दुकांनामध्ये प्रत्येकी सरासरी 150 ते 200 किलो श्रीखंडाची विक्री झाल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Bhaubeej 2019: भाऊबीजे निमित्त ओवाळणीत चुकूनही देऊ नका ह्या '3' गोष्टी ज्या मानल्या जातात अशुभ
मुंबईमध्ये सोमवारी रात्री म्हणजे पाडव्याच्या दिवशी श्रीखंड खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. तसेच मंगळवारी दुपारपर्यंत या रांगा कायम होत्या, असंही दुकानदारांनी सांगितलं. सोमवारी मोठ्या प्रमाणात श्रीखंडाची विक्री झाली. त्यामुळे सोमवारी रात्री अतिरिक्त श्रीखंड तयार करण्यात आले. यंदा मुंबईकरांनी मिठाईमध्ये सर्वाधिक काजू कतलीची खरेदी केली, असंही एका मिठाई दुकानदारांने सांगितलं.