पुणे येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तरांबळ
Represntational Image |(Picture Credit: File Image)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली आहे. तर आता पुन्हा पुणे येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच साजरा करण्यात आलेल्या दिवाळी सणात सुद्धा पावसाने हजेरी लावली होती. पण आता हिवाळ्याच्या सुरुवातीला सुद्धा पावसाने कमबॅक केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर सुरु झाला आहे.संध्याकाळी 6 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहराच्या पूर्व भागातील उपनगरात पावसाने हजेरी लावली, विमाननगर, वडगावशेरी, वाघोली, धानोरी या ठिकांणी मुसळधार पाऊस पडत आहेत. तर बिबवेवाडी, कोंढावा येथे सुद्धा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे.

यंदा राज्यात पाऊस पुरेसा झाल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही असे सांगण्यात आले आहे. मात्र पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती झाली होती. त्यामध्ये अनेक नागरिकांची घरे वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाकडून याकडे कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी करत संताप व्यक्त केला होता.(औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; अवकाळी पावसामुळे मक्याचे मोठे नुकसान)

तर भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या पूर्वसुचनेनुसार 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.