ठाणे: रहेजा गार्डन परिसरात पार्क केलेल्या गाड्यांवर झाड कोसळलं, वाहनांचं नुकसान
Tree Falls On Parked Vehicles In Thane (Photo Credits: ANI)

Monsoon Accidents Cases: मुंबईसह ठाणे (Thane)  आणि नवी मुंबईत (Navi Mumbai)  पावसाने दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. एकीकडे या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पाण्याच्या साठ्यात आश्वासक वाढ होत असल्याने मुंबईत आनंदीआनंद पाहायला मिळत आहे पण त्याचवेळी वारंवार समोर येत असणाऱ्या पावसाळी अपघातांमुळे या आनंदाला गालबोट लागत आहे. आतापर्यंत राज्यात मुंबईसह पुणे (Pune) , अकोला (Akola)  ,नांदेड (Nanded)  मध्ये अनेक जणांना पावसाच्या पहिल्याच झटक्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी बऱ्याच ठिकाणी अंगावर झाड कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आज सकाळी सुद्धा पावसामुळे ठाण्यातील रहेजा गार्डन (Raheja Garden)  परिसरात पार्किंग मध्ये ठेवलेल्या वाहनांवर झाड कोसळल्याचे समजत आहे. सुदैवाने यावेळी गाड्यनमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झालेली नाही मात्र वाहनांचे बरेच नुकसान झाले आहे

ANI ट्विट

 हे ही वाचा - महाराष्ट्रात पावसाच्या सरींचे थैमान, 24 तासात घेतले 20 हुन अधिक बळी, वाचा सविस्तर तपशील

 

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी झाडाला हटवण्याचे कार्य सुरू केले आहे.