मराठी साहित्यिक असताना, नयनतारा सहगल यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सवाल

या साहित्यसंमेलनाचं उद्धाटन अमराठी साहित्यिकाकडून होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांनी राज्य उपाध्यक्ष राजू उंबारकर त्याला विरोध केला आहे.

Raju Umbarkar (Photo Credits: Facebook)

आगामी मराठी साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच चर्चेमध्ये आलं आहे. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sanmelan) आयोजन यवतमाळमध्ये होणार आहे. या साहित्यसंमेलनाचं उद्धाटन अमराठी साहित्यिकाकडून होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)  यांनी राज्य उपाध्यक्ष राजू उंबारकर त्याला विरोध केला आहे. मराठी साहित्यिकांची किर्ती देशभर आहे मग मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटनासाठी इंग्रजी साहित्यिकांना का बोलावलं जातं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे या 92 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. या साहित्यसंमेलनाचे उद्धाटन इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे. नयनतारा यांनी भारतामध्ये 'पुरस्कार वापसी' या मोहिमेची सुरूवात केली.

देशामधील असहिष्णू वातावरणावर टीका करत साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. त्यांच्यासोबतच 10 दिग्गज साहित्यिकांनीही आपले पुरस्कार परत केले होते. नयनतारा सेहगल या भारताचे पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या भाची आहेत. 1986 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने 'रिच लाईक' या पुस्तकासाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रामदास फुटाणे आणि श्री आशुतोष शेवाळकर यांच्या प्रकट मुलाखतीमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा एका मराठी माणसानेच चित्रपटसृष्टी उभी केली. २१ व्या शतकाला ज्या-ज्या बाबी संचलित करतात, तेथे-तेथे मराठीला ज्ञानभाषा म्हणून रुजवावे लागेल, तरच अधिक चांगले वैभव मराठीला प्राप्त करून देता येईल अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.