Ameya Khopkar and Sanjay Raut (Photo Credits: Facebook)

कोविड-19 (Covid-19) लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात स्थलांतरीत मजूरांना (Migrant Workers) स्वगृही पाठवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने मोठे काम केले. सोनूच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून सोनूवर टीका केली. राऊत यांनी सोनूवर केलेल्या टिकेनंतर मनसे नेते अमेय खोपकर (MNS Leader Ameya Khopkar) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलंत?' असा थेट सवाल खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले, "माननीय संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्या पलिकडे काय केलंत? ज्याने काम केलंय त्याचं कौतुक करूया... मनाचा मोठेपणा दाखवुया... असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार..." (स्थलांतरीत मजूरांना केलेल्या मदतीनंतर 'महात्मा सोनू' म्हणत सामना अग्रलेखातून संजय राऊत यांचा अभिनेता सोनू सूद याला टोला)

अमेय खोपकर ट्विट:

दरम्यान "लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक प्रकट झाला. इतक्या पटकन आणि सहज कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते का? सोनूने मदत केली म्हणजे स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नाबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने काहीही पाऊले उचलली नाहीत?" असे म्हणत संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सोनूच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. तसंच सोनू हा चांगला अभिनेता आहे. त्याने केलेले काम चांगले आहे. परंतु, यामागे वेगळाच राजकीय दिग्दर्शक असण्याची शक्यता आहे, असेही संजय राऊत म्हणाले.