महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात येथील शेतीला, मनसे माजी आमदार नितीन भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
देवेंद्र फडणवीस (Photo credit : youtube)

राज्यात सध्या नागरिक दुष्काळाला सामोरे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी तरीही गुजरात (Gujrat) येथील शेतीला देण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे (MNS) माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सुद्धा या प्रकरणी टीका करण्यात आली आहे.

दुष्काळाची परिस्थिती असून ही 40 टीएमसी पाणी गुजरातकडे वळवले जात आहे. तर फडणवीस यांच्याकडून यापूर्वी देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. त्यामुळे फडणवीस त्यांच्या जाहीर सभेतून खोटी माहिती देश जनतेची दिशाभूल करतात असे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात असा कोणताच करार झालेला नाही.(मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली तात्काळ सुरक्षेची मागणी)

मात्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खुश ठेवण्यासाठी हे पाणी अडवत नाहीत. तसेच फडणवीस यांच्याकडे याबद्दल वारंवार चर्चा करुन सुद्धा कोणते पाऊल उचलले नसल्याचे ही भोसले यांनी म्हटले आहे.