MHT-CET 2020 Re-Exam: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सीईटीच्या PCM,PCB ग्रुपची प्रवेश पत्र डाऊनलोडही परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रात पुन्हा परीक्षा होणार: उदय सामंत यांची माहिती
Representational Image (Photo Credits: PTI)

MHT-CET 2020 Re-Exam: देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने अद्याप शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरु झालेले नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या. याच पार्श्वभुमीवर एमएचटी-सीईटीची परीक्षा 2020 ही 1 ऑक्टोंबर पासून सुरु झाली असून ती 20 ऑक्टोंबर पर्यंत आयोजित केली गेली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र सुद्धा डाऊनलोड केले. मात्र राज्यातील विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षेच्या काळात उद्भवलेल्या अतिवृष्टीच्या काळात पेपर कसा द्यायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थितीत झाला. याच कारणास्तव आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

उदय सामंत यांनी एक ट्विट करत असे म्हटले आहे की, MHT-CET 2020 प्रवेश परीक्षेच्या PCM व PCB या गटाकरीता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड केलेले आहे. परंतु अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे ते परीक्षेला बसू शकले नाहीत,अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी दिली जाईल. त्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल.(7th Pay Commission: महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सह 6 अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 नोव्हेंबर पासून लागू होणार)

दरम्यान, एमएचटी-सीईटीच्या परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होत्या. पण कोरोना व्हायरसमुळे त्या पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येत आहेत. तर पहिल्या टप्प्यात पीसीबी या ग्रुपची परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्याच पीसीएमची परीक्षा होणार आहे. राज्यात 13 सीईटी परीक्षेसाठी 6 लाख 91 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 5 लाख 32 हजार 361 विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी अर्ज दाखल केला आहे.