Mega Block: उद्या हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
Mumbai local | (Archived and representative images) I File Photo

Mumbai MegaBlock: मुंबईच्या तिन्हीही लोकल रेल्वे मार्गांवर (Mumbai Railway) दर रविवारी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. या रविवारी (10/2/2019) पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र हार्बर किंवा पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार असाल तर बाहेर पडण्यापूर्वी एकदा मेगाब्लॉकच्या वेळा तपासून पहा.

हार्बर मार्ग

रविवारी सकाळी 11:40 ते दुपारी 4:10 मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि बांद्रा दरम्यान हा मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गवारील लोकल फेऱ्या बंद राहतील. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन पनवेलसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान लोकल 15-20 मिनिटं उशिराने धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिन रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 या ब्लॉक काळात सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसंच ब्लॉकमुळे लोकल काहीशा उशिराने धावतील.