MAPMC Election 2020: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकासआघाडीचे अशोक डक सभापती,  धनंजय वाडकर उपसभापतीपदी
MAPMC | (Photo Credits: mumbaiapmc.org)

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक डक (Ashok Duck) तर उपसभापती पदावर काँग्रेस पक्षाचे धनंजय वाडकर (Dhananjay Wadkar) यांची निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विशेष म्हणजे अशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती अशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची (MAPMC) ओळख आहे. त्यामळे अशा संस्थेवर सत्ता असणे हे महाविकासआघाडीसाठी अधिक महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी संचालक मंडळाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 18 संचालकांपैकी महाविकासआघाडीचे 16 संचालक निवडूण आले होते. त्यामुळे सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर महाविकासआघाडी बाजी मारणार हे जवळपास नक्की होते. परंतू, भाजपकडून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र, वास्त असे की या निवडणुकीत भाजपला एकही उमेदवार निवडूण आणता आला नाही. या निवडणुकीत भाजपला शून्य जागा मिळाल्या. (हेही वाचा,MAPMC Election 2020: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक येत्या 31 ऑगस्टला, शशिकांत शिंदे यांच्याकडे सूत्रे )

कोरोना व्हायरस संकटामुळे लांबणीवर पडलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणूक अखेर पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण सोनवणे यांनी पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांच्याकडे दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन पार पडली.