दादर फूलमार्केटमध्ये दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या , हल्लेखोर फरार
दादर फूलमार्केट गोळीबार ( प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay

दादर फूल मार्केट हा नेहमीच गर्दी आणि वर्दळीचा रस्स्ता आहे. आज सकाळी दादर फूलमार्केटमध्ये एका इसमावर दिवसाढवळ्या गोळ्या घालून त्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव मनोज मौर्य आहे.  हल्लेखोर फरार  बाईकवरून आले होते. त्यांनी दादर फूल मार्केटच्या फ्लायओव्हर भागात गोळीबार केला.

दादर फूलमार्केटमध्ये पहाटेपासूनच व्यवसायाला सुरूवात होते. सध्या नवरात्रीचे दिवस असल्याने दादर फूलमार्केटमध्ये  ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. अशातच आज सकाळी सहाच्या सुमारास मनोज मौर्य या व्यक्तीवर समोरून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून गोळी झाडणारी व्यक्ती फरार आहे. या प्रकारणी स्थानिक पोलिसांचं तपासकार्य सुरू आहे.

मनोज मौर्य यांची हत्या अंतर्गत वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी हत्या झालेला भाग सिल केला आहे. दादरसारख्या परिसरात अशी घटना दिवसाढवळ्या घडल्याने अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.