Beed: बीड येथील एका हार्डवेअर प्लायवूडच्या दुकानात स्फोट; एकाचा मृत्यू
blast | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

बीड (Beed) येथील एका हार्डवेअर प्लायवूडच्या दुकानात स्फोट (Chemical Explodes) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड शहरातल्या जिजामात चौक येथे घडली आहे. या स्फोटात एका जणाचा मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या स्फोटची तीव्रता एवढी होती की, बाजुच्या इमारातीच्या काचेच्या खिडक्याही फुटल्याचे समजत आहे. घटनास्थानी बॉम्ब शोधक, दहशतवादीविरोधी पथकासह श्वास पथकही आले होते. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली होती.

बीड शहरातील जिजामाता चौक परिसरात व्यापारी नितीन भगवानदास लोढा यांचे प्लायवुडचे गोदाम आहे. या ठिकाणी प्लायवुडसह फेविकॉल तसेच इतर काही केमिकलचे कॅन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजता या ठिकाणी काम करणारे अनिरूद्र पांचाळ (30, रा.सेलू, ता.गेवराई ह.मु.लक्ष्मणनगर बीड) हे तिथे आलेले असताना अचानक जुन्या केमीकलचा स्फोट झाला. यात अनिरूद्र यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षा चालक सुधीर जगताप आणि कामगार किसन मुणे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Dombivli Fire: डोंबिवली एमआयडीसी खांबालपाडा परिसरातील शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

ट्विट-

या गोदामाच्या शेजारी एक खासगी हॉस्पीटल आहे. जेव्हा हा स्फोट झाला, तेव्हा शेजारील हॉस्पीटलच्या काचा फुटल्या. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसर हादरुन गेला आणि एक किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना या स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटाची कारणे शोधण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.