महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस ला जागा नाही? ठाणे शहरात काँग्रेसनेच लावलेले 'हे' पोस्टर पाहुन तुम्हाला काय वाटंत सांंगा
Thane Congress Poster (Photo Credits: Ram Kadam Twitter)

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)  स्थापन करताना शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी कॉंंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेस (Congress) या पक्षांंनी हातमिळवणी केली खरी पण मागील अनेक प्रसंंगात या तीन्ही पक्षातील चढाओढ स्पष्ट पणे दिसुन आली आहे. काही ना काही मार्गाने त्या त्या वेळी ही परिस्थीती नियंंत्रणात आली असली तरी मुळ वाद काही संंपलेला दिसत नाही. याचेच एक उदाहरण सध्या ठाणे शहरात पाहायला मिळत आहे. ठाणे (Thane) शहर अध्यक्ष अ‍ॅड. विक्रांंत चव्हाण (Adv. Vikrant Chavhan) यांंच्या नावे ठाण्यात एक असा पोस्टर झळकवण्यात आला आहे की ज्यात महाविकास आघाडी मधील बिघाड पुन्हा एकदा दिसुन येतोय. भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांंनी या पोस्टरचे फोटो शेअर करत तुम्ही तुमच्या भांंडणात महाराष्ट्राचं वाटोळंं केलंंत अशा शब्दात सरकार वर ताशेरे ओढले आहेत, काय आहे हा प्रकार सविस्तर पाहा.

ठाण्यात ठाकरे सरकारची वचनपूर्ती म्हणत एक बॅनर लावण्यात आला आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र काँग्रेस च्या नेत्यांंचा किंंवा एकुणच कॉंग्रेसचा उल्लेख ही केलेला नाही. यावरुनच ठाणे कॉंग्रेस ने शेजारीच दुसरे पोस्टर लावुन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर हे सरकार सत्तेवर आलं असतं का? सरकार तिघांचं मग नाव फक्त दोघांचे का ? असा सवाल केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयात कॉंग्रेसलाही श्रेय आहे असे आम्ही नम्रपणे सांंगत आहोत असेही यात म्हंंटलेले आहे.

राम कदम ट्विट

दरम्यान, कॉंंग्रेसच्या पक्ष स्तरावरच सध्या बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करत सोनिया गांंधी यांंना पत्र लिहिले होते. यावर 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी "पत्र लिहिलेल्यांंपैकी काहींना अध्यक्ष व्हावे असं वाटत असावं पण त्यांच्यात एका मध्येही राष्ट्रीय नेतृत्व करावं अशी ताकद आणि कुवत नाही" अशी टीका केली होती.