Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता, अनेक ठिकाणी Yellow Alert जाहीर
Photo Credit: File Image

Maharashtra Monsoon Update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे. मात्र उद्यापासून पुन्हा तीन दिवस (4-6 सप्टेंबर) जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोला, वाशिम, बुलढाणा. अमरावती आणि यवतमाळ येथे यल्लो अलर्ट (Yellow Alert) जाहीर करण्यात आला आहे.(Ganeshotsav 2021: कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमात मुभा द्या अन्यथा 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा)

बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाच्या क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४-६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Jalgaon Flood: पुरामुळे जळगाव जिल्ह्यात 15,195 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कोकणच्या धर्तीवर मिळणार मदत, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय)

Tweet:

दरम्यान, मुंबई- ठाणे येथे गेल्या 24 तासात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. परंतु आता काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले झाले असून हलक्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,  पुढील 2-3 दिवस कोरडे हवामान राहणार नाही. पण महाराष्ट्रात येत्या 4-5 दिवसात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.